महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी/सातारा : सातारा जिल्ह्यात लाचखोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. सातारा नगरपालिकेतील लाचखोरीचे प्रकरण गाजत असतानाच आज फलटण विजवितरण उपविभागातील अतिरिक्त कार्यकारी अभियंता 20 हजारांची लाच घेताना सापळ्यात अडकला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, तक्रारदार यांनी घेतलेल्या एका इमारतीच्या इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टमधील 11 नवीन मीटरचे कोटेशन देण्यासाठी नंदकुमार भानुदास काळे – अतिरिक्त कार्यकारी अभियंता वर्ग १, म.रा.वि.वि. उपविभाग फलटण याने तक्रारदार यांना २० हजार रुपयांची लाच मागितली.
आज नंदकुमार काळे याला ती लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ताब्यात घेऊन फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरच्या कारवाईत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर पोलीस अधीक्षक सुषमा चव्हाण, पोलिस उपअधीक्षक अशोक शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अविनाश जगताप आणि पथकाने सहभाग घेतला.
































