पाटण – घर आणि विज्ञान यांचा अतूट संबंध आहे. घरातील प्रत्येक घटनेत विज्ञान आहे. या घटनांचा कार्यकारणभाव समजून घेतला पाहिजे. जीवन जगताना विज्ञान गरजेचे आहे. त्यामुळे विज्ञान प्रबोधनाची सुरवात घरातून करावी. असे प्रतिपदन कल्पना चावला विज्ञान केंद्राचे संस्थापक डॉ. संजय पुजारी यांनी केले. ते येथील बाळासाहेब देसाई कॉलेज, पाटण मध्ये विज्ञान मंडळ आयोजित विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोयना शिक्षण संस्थेचे संचालक, संजीव चव्हाण होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.डी. पवार, जिमखाना उपाध्यक्ष डॉ. सी. यु. माने विज्ञान मंडळाचे निमंत्रक डॉ. एम. आर. कदम, कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा. डी. बी. दाभाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. संजय पुजारी पुढे म्हणाले, विज्ञानाने जगण्याचे हक्क प्राप्त करुन दिले आहे. जन्मापासून मनुष्य लसीच्या माध्यमातून विज्ञानाचे कवच घेत आहे. कोविड सारख्या भयकर आजाराची लस विज्ञानामुळे तयार झाली त्यामुळे मनुष्य जीव सुरक्षित झाला, भाकड कथाच्या मागे न लागता विज्ञानाची कास धरावी प्रत्येक गोष्टीत विज्ञान आहे. ते समजावून घेतले पाहिजे. धर्माच्या नावावर श्रीमंत होणारे लोक भीती दाखवण्याचे काम करतात. ती भीती मनातून काढून टाकावी व विज्ञाननिष्ठ बनावे. यावेळी डॉ. संजय पुजारी यांनी विविध प्रात्यक्षिका द्वारे विज्ञान समजून त्यासागितले त्याचबरोबर पर्यावरण पी पी टी सादर करुन पर्यावरण जागृती केली. अध्यक्षीय भाषणात संजीव चव्हाण म्हाणाले, विज्ञानाची उत्तरोत्तर होणारी प्रगती आपण पाहत आलो आहे. अंधश्रध्दा पसरविण्यासाठी विज्ञानाचा आधार घेतला जातो हे धोकादायक आहे. आपण विज्ञाननिष्ठ झाले पाहिजे विज्ञानच सर्वश्रेष्ठ आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. एम. आर. कदम यांनी केले तर आभार डॉ. डी. आर. फडतरे यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. एम. आर. सपकाळ, प्रा डी. डी. थोरात, प्रा. डॉ. भिंगारदेवे, डॉ एस आर सुपणेकर यांनी केले. कार्यक्रमासाठी विविध शाळांचे मुख्याध्यापक, प्राध्यापक,शिक्षक व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते
फोटो – डॉ संजय पुजारी मार्गदर्शन करताना स्टेजवर उपस्थित संजीव चव्हाण, प्राचार्य डॉ. एस.डी. पवार, सी. यु. माने , डॉ. एम. आर. कदम, प्रा. डी. बी. दाभाडे