महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :
सातारा : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मौजे होळीचा गाव तालुका खटाव येथील महेंद्र नारायण देशमुख व प्रशांत शिवाजी शिंदे यांच्या शेतावर आंबा फळबाग लागवडीचा शुभारंभ पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात करण्यात आला.
तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत हनुमंत सुखदेव भोसले यांच्या शेतावर गांडूळ खत युनिट या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी श्री भोसले यांच्या बांधावरच राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान कडधान्य योजने मधून व आत्मा योजनेमधून प्रात्यक्षिकासाठी निवड केलेल्या लाभार्थ्यांना बियाणे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय कुमार राऊत, उपविभागीय कृषी अधिकारी महेश झेंडे, तहसीलदार डॉ.अर्चना पाटील, तालुका कृषी अधिकारी अरुण जाधव व मंडळ कृषी अधिकारी मायणी दिलीप दाभाडे, भाऊसाहेब लादे माजी उपसभापती पंचायत समिती खटाव, शिवाजीराव सर्वगोड माजी सभापती समाज कल्याण जिल्हा परिषद सातारा, सरपंच होळीचागाव, ग्रामसेवक, तलाठी, शेतकरी व कृषी विभागातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.