महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :(बारामती )
बारामती उपविभागातील अवैद्य धंद्याला आळा घालण्यासाठी बारामती उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी सातत्यपूर्ण कठोर कारवाया करण्यात येत आहेत. त्यामुळे बारामती उपविभागात अवैद्य धंद्याना ब-याच प्रमाणात आळा बसल्याचे दिसून येत आहे. या अवैद्य धंद्याना वैतागलेल्या नागरिकांकडून पोलीस प्रशासनाचे कौतुक केले जात असून त्यांचे आभार मानले जात आहेत.
टाळेबंदीच्या काळात बारामती उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शना खाली बारामती उपविभागातील पोलिसांनी दि. २३ मार्च ते २८ जुलै या तीन महिन्यांच्या कालावधीत बारामती उपविभागाच्या कार्यक्षेञातील बारामती शहर, बारामती तालुका, वडगाव निंबाळकर, वालचंदनगर, इंदापूर, भिगवण या ६ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गोपनीय माहिती मिळवून जुगार, दारू, गुटखा, गांजासह कत्तलखाने, अवैद्य वाळू उपसा अशा अनेक अवैद्य धंद्यावर कठोर कारवाई करून जवळपास ७०० हून अधिक जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. व त्यांच्याकडून तब्बल १ कोटी ३२ लाख ४ हजार ४०७ रुपयांचा मुद्देमालही जप्त कण्यात आला आहे. बारामती शहर, बारामती तालुका व वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात टाळेबंदी दरम्यान तब्बल २१४ अवैद्यदारू धंद्यावर तर २८ ठिकाणी बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर छापा टाकून ४६१ जणांवर कायदेशीर कारवाई कण्यात आली असून या दोन्ही कारवाईत तब्बल २६ लाख २५ हजार ६९५ रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.
आशाच प्रकारची कारवाई वालचंदनगर, इंदापूर व भिगवण पोलिस ठाण्याच्या हद्दीत करून १४८ आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. त्यांच्याकडून ४ लाख २४ हजार ६०४ रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आलेला आहे.यासह बारामती उपविभागात गांजा, वाळू उपसा, कत्तलखाने अशा अवैध धंदा करणाऱ्यांवर ही गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. टाळेबंदीच्या काळात बारामती उपविभागात पोलिसांनी अवैद्य दारू, गुटखा, मादक पदार्थ( गांजा), कत्तलखाने, वाळू उपसा असे अवैध धंदे करणा-या ७०३ आरोपींवर ४२३ गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. व त्यांच्याकडून तब्बल १ कोटी ३२ लाख ४ हजार ४०७ रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.
१५ गावठी कट्टे जप्त….बारामती उपविभागातील गुन्हेगारीचे सुमुळ नस्ट करण्यासाठी टाळेबंदीतही गुन्हेगारीशी संबंधित असणा-यांची गोपनीय माहिती घेऊन टाळेबंदी दरम्यान बारामती उपविभागातून १५ गावठी कट्टे जप्त करण्यात आलेले आहेत.
उपविभागातील अवैध धंद्याचे समूळ नस्ट करण्याची कारवाई सुरू आहे. अवैध धंदा करणा-यांवर यापुढे तडीपार, मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.नारायण शिरगावकर -(उपविभागीय पोलिस अधिकारी.बारामती) बारामती उपविभागात केलेल्या
कारवाई- अ.नं कायदा एकूण दाखल आरोपी एकूण मुद्देमाल
अ.नं कायदा एकूण दाखल आरोपी एकूण मुद्देमाल
१ महाराष्ट्र जुगार कायदा ४८ ३५० २०२०७३२
२ महाराष्ट्र दारुबंदी कायदा ३५३ ४०० २९४९०८४
३ अवैध गुटखा ०३ ०४ २३९०९१
४ मादक पदार्थ(गांज्या) ०५ ११ ८२०९४०
५ कत्ताल खाना (केसेस) ०७ २५ ३०३१०००
६ वाळू ०७ १३ १२६३५६०
एकूण ४२३ ७०३ १०३२४४०७