म्हसवड प्रतिनिधी म्हसवड नगरपालिका कार्यालयास लागणारी लाईट व दुरुस्ती यासाठी दरवर्षी लाखो रुपये खर्च जात होता त्याच प्रमाणे हजारो युनिट वाया जात होते वाया जाणारे युनिट व पैसा वाचवण्यासाठी म्हसवड शहराध्यक्ष युवराज सुर्यवंशी व माजी उपनगराध्यक्षा सौ स्नेहल सुर्यवंशी यांनी खासबाब म्हणून मा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उर्जा मंत्री नितीन राऊत, जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचे कडून १० कि. वॅट क्षमतेचा पारेषण विरहीत सौर ऊर्जा प्रकल्प व दरवर्षी किमान ६०००० रुपयाची बचत होणाऱ्या महाऊर्जा अंतर्गत ऊर्जा संवर्धन प्रायोगिक प्रकल्प ह्या दोन्ही प्रकल्पासाठी १३ लाख ४४ हजार ७५२ रुपये मिळवून देण्याचे काम महाराष्ट्र राज्य महाऊर्जाचे प्रभारी महासंचालक श्री सुरज वाघमारे यांनी मिळवून दिले असल्याची माहिती युवराज सुर्यवंशी यांनी दिली पंधरा वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सुसज्ज अशी देखणी प्रशासकीय नगरपालिकेची इमारत मंजूर करुन बांधण्यात आली होती या इमारतीच्या तळमजल्यावर पाच रुम चार रुम डेड मटेरयल लाईट दुरुस्ती, व गोडाऊन, एक रुम आवक जावक दुसऱ्या मेन मजल्यावर मुख्याधिकारी केबीन, आत वेगळी केबीन दुसऱ्या बाजूला नगराध्यक्ष केबीन, दुसरी वेगळी रुम, एक स्वच्छता सभापती, एक पाणीपुरवठा सभापती, एक शिक्षण सभापती, उपनगराध्यक्ष केबीन , अभियंता रुम , घरकुल अधिकारी, महिला बचत गट, कर वसुली रुम तिसऱ्या मजल्यावर सभागृह लेखापाल रुम, संगणक कंट्रोल रुम या सर्व रुम मधील लाईटवर चालणारी सर्व उपकरणे यांना लागणारी विज व त्याचे होणारे रिडींग आणि त्या रिडींगचे महिन्याला येणारे केवळ प्रशासकीय इमारतीचे लाखो रुपयेचे लाईट बिल यामुळे आधीच पाणीपुरवठा लाईट बिल, पाणी खरेदी लाईट बिल, म्हसवड हद्दीतील शहर सर्व वाड्या वस्त्यावरील रोड लाईट त्याच प्रमाणे वाड्या वस्त्यावरील असणाऱ्या स्वतंत्र पाणी पुरवठा योजनेला असलेल्या विजेचा खर्च, भागवता भागवता दर महिण्याला पालिकेची दमछाक होत आसते पालिका इमारत कार्यालया मधील सर्व विभागातुन येणारे लाईट बील वाचवण्यासाठी महाराष्ट्र राज्य महाऊर्जाचे प्रभारी महासंचालक श्री सुरज वाघमारे यांच्याकडे माजी उपनगराध्यक्ष स्नेहल सुर्यवंशी व माजी नगरसेवक व राष्ट्रवादी पक्षाचे नेते युवराज सुर्यवंशी यांनी लेखी मागणीनुसार व महा ऊर्जाचे महासंचालक श्री वाघमारे यांच्या प्रयत्नातून व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, ऊर्जा मंत्री नितीन राऊत, पालकमंत्री व सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या शिफारसी मुळे म्हसवड नगरपालिका इमारतीवर पारेषण विरहित सौर ऊर्जा 10 किलो वॅट क्षमतेचा बॅटरी बॅकअप सह प्रकल्प तयार केल्यामुळे पालिकेच्या ९००० युनिटची बचत होऊन दरवर्षी १ लाख २००० हजार रुपयेची बचत होणार आसुन या प्रकल्पास ९२०,००० रुपयेचा निधी दिला त्याच प्रमाणे पालिका इमारती मधील लाईटची जी जुनी अकार्यक्षम उपकरणे बदलण्यासाठी महा ऊर्जाचे अंतर्गत महाराष्ट्र शासन व केंद्र सरकार राबवत असलेल्या ऊर्जा संवर्धन प्रायोगिक प्रकल्पामुळे अकार्यक्षम उपकरणावर प्रतिवर्षी ६०००० युनिट होणारे या नवीन उपकरणामुळे केवळ ६४३२ ऐवढया युनिटची बचत होणार आहे या प्रकल्पाचा खर्च ४ लाख २४ हजार ७५२ रुपये ऐवढा आसुन या दोन्ही प्रकल्पास १३ लाख ४४ हजार ७५२ रुपयेच्या निधीतून हा प्रकल्प पूर्ण झाला आहे यामुळे पालिकेचे दरवर्षी लाखो रुपये वाचणार आसुन या बरोबर अकार्यक्षम उपकरणामुळे व सतत होणाऱ्या विजेचे युनिट या दोन्ही प्रकल्पाने वाचणार आहेत चौकट १) युवराज सुर्यवंशी राष्ट्रवादी शहराध्यक्षम्हसवड पालिका इमारतीला लागणारी लाईट व लाईट गेल्यावर लागणारे डिझेल यासाठी जाणारे लाखो रुपये वाचवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महाऊर्जा प्रकल्पाचे महासंचालक व आमचे मित्र सुरज वाघमारे यांच्या प्रयत्नातून पूर्ण झाला आसुन त्याचा वापर सध्याचांगल्या प्रकारे सुरू आसुन म्हसवड प्रमाणे सातारा जिल्ह्यातील अनेक ठिकाणी हा महत्वपूर्ण प्रकल्प उभारला आहे आगामी काळात म्हसवड पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाला व रोड लईट हि या प्रकल्पावर सुरु करण्यासाठी निधीची मागणी करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व शहराध्यक्ष युवराज सुर्यवंशी यांनी सांगितले
२) डॉ सचिन माने, मुख्याधिकारी म्हसवड नगरपालिका म्हसवड पालिकेवर उभारलेल्या महाराष्ट्र शासनाच्या पारेषण विरहित सौर ऊर्जा व ऊर्जा संवर्धन या दोन प्रकल्पामुळे पालिकेचा लाईटसाठीचा लाखो रुपये खर्च वाचला तर गेले अनेक वर्षापासून बंद पडलेली उपकरणे काढून त्याऐवजी नवीन लाईट कमी व कमी युनिटची उपकरणे इमारतीत वापरली आहेत यामुळे म्हसवड पालिकेला २५ ,३०वर्षे लाईट बिलाचा खर्च वाचणार आहे म्हसवड पालिका सौर ऊर्जेत स्वयंपूर्ण झाली आहे