महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :मिलेश बरकडे (लिंब )
सातारा तालुक्यातील लिंब गावामधील एकाच दिवशी ट्रॅव्हल हिस्ट्री असलेले कोरंटाईन केलेले दोघे जण कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लिंब गाव व बाजारपेठ बंद करण्यात आली आहे.
याबाबत माहिती घेतली असता लिंब येथील दोघे जण मुंबई येथे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील आगारात चालक म्हणून कार्यरत होते. सलग एक महिना कोव्हीड १९ मध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची ने आण करण्याचे काम केल्यानंतर त्यांना सुट्टी मिळाली होती, ते मुंबईतून आल्यानंतर स्वतःहून गौरीशंकर कॅम्पसमधील इमारती मधील विलागीकरण कक्षात कोरंटाईन झाले होते.
दरम्यान कोरंटाईनच्या काळात त्यांचे स्वेब घेण्यात आले असता त्यामध्ये ते कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने त्यांना सातारा सिव्हील मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पो नि सजन हंकारे साहेब आणि सातारा तालुका आरोग्य अधिकारी डॉ डी जी पवार यांनी कोरंटाईन केलेल्या इमारतीस भेट देऊन पाहणी करत संबंधीत कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या.आता पर्यंत लिंब गावामध्ये ४ जणांचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला असून त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध चालू आहे.यावेळी सातारा पंचायत समितीचे माजी उपसभापती जितेंद्र सावंत, लिंबचे सरपंच ऍड अनिल सोनमळे, पो ह राजू मुलांनी, बागवान, रवींद्र शिंदे, राहुल सावंत, घनश्याम सावंत , सुभोध भोसले, सागर दळवी, राजेंद्र शिंदे व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लिंब गाव व बाजारपेठ बंद करण्यात आली आहे.