महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : बारामती
बारामती शहरामध्ये मारवाड पेठ येथील बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीत राजस्थान सारीज दुकानाचे बेसमेंट मधील गाळ्यातून अज्ञात चोरटयांनी गाळ्याचे शटर उचकटून त्यातील जवळपास १९०००/- रुपये किमतीचा माल चोरी करून नेला याबाबत बारामती शहर पोलीस स्टेशन येथे दुकानफोडीचा गुन्हा दाखल केला होता.
चोरी गेलेल्या मालाचा व अज्ञात आरोपींचा शोध बारामती शहर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाने तपस सुरु केला. बारामती शहरातील आमराई वसाहत येथील महिला आरोपी आरती शंकर पाथरकर, सारिका लाला भले, दुर्गा आकाश साळुंके, शकीला इस्माईल कुरेशी, याना ताब्यात घेतले असता या महिलांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.
तपासादरम्यान या महिला आरोपींकडून जवळपास १९०००/- रुपये किमतीचा चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करून गुन्ह्याचे पुरावे जप्त करण्यात आले असून सदर गुन्ह्याचा तपस अद्याप सुरु आहे.
सदर गुन्ह्याचा उलगडा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक श्री.औदुंबर पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस स्टेशन गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक श्री. पद्मराज गंपले, योगेश शेलार, सहा.फौजदार संदीपान माळी, पो.ना. ओंकार सीताप ,पो. कॉ. पोपट नाळे, राजेश गायकवाड, सिद्धेश पाटील, पोपट कोकाटे, सुहास लाटणे, अंकुश दळवी, दशरथ इंगवले, अजित राऊत, योगेश कुलकर्णी, अकबर शेख, उमेश गायकवाड, यांनी केली.