साखरवाडी प्रतिनिधी (अनिल पिसाळ)
मराठा समाजाला तात्काळ आरक्षण मिळावे तसेच मराठा समाजातर्फे आयोजित बंदला आमचा जाहीर पाठिंबा असल्याचे साखरवाडीतील मुस्लिम समाज बांधवांनी साखरवाडी पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन शिंदे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे
जालना जिल्ह्यातील मराठा समाजातील पुरुष व महिला आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीचाराचा निषेधार्थ जाहीर निषेध म्हणून मराठा आरक्षणासाठी सातारा जिल्ह्यासह साखरवाडीत कडकडीत बंद असून मराठा आरक्षणासाठी आम्ही कायम मराठा समाजा सोबत आहोत यावेळी मुस्लिम समाजाच्या वतीने शौकत कच्छी,फिरोज शेख,अरिफभाई मनेर,अन्वर महात उपस्थित होते.






















