साताऱ्यातील एबीपी माझा चे पत्रकार राहुल तपासे यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना कठोर शासन करण्यात यावे अशी मागणी सातारा जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष हरिष पाटणे यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर केली आहे
पत्रकार राहुल तपासे हे 30 मे रोजी महामार्गावरून जात असताना समोरील गाडीमध्ये दारू पीत असलेल्या व्यक्तींकडे बघितल्याच्या रागातून त्या गाडीतील तीन व्यक्तींनी संगणमत करून त्यांची चारचाकी गाड राहुल तपासे यांच्या गाडीला मागून जोरदार धडक देऊन त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता याप्रकरणी मराठी पत्रकार परिषदेचे सातारा जिल्हाध्यक्ष हरिष पाटणे सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी या दोघांना याबद्दलची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ आरोपींना अटक करण्याची मागणी करत त्यांच्यावर गंभीर गुन्हे देखील दाखल करण्यासाठी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक अजित कुमार बंसल यांच्याशी संपर्क साधून मागणी केली होती त्यानंतरच या प्रकरणातील एका आरोपीला देखील पोलीस पोलिसांनी अटक केली आहे सातारा जिल्ह्यातील कुठल्याही पत्रकाराला यापुढे केसाला जरी धक्का लागला तरी सातारा जिल्ह्यातील सर्व पत्रकारांना एकत्र घेऊन त्या गुन्हेगाराच्या विरुद्ध तीव्र आंदोलन उभे करून त्याला कठोर शासन देण्यापर्यंत साताऱ्यातील पत्रकार प्रयत्न करत राहतील त्यामुळे सातारच्या पत्रकाराच्या केसाला देखील मी धक्का लावून देणार नाही असे मत मराठी पत्रकार परिषदेचे सातारा जिल्हाध्यक्ष हरिष पाटणे यांनी बोलताना व्यक्त केले आहे