महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :अमोल राजपूत (वालचंदनगर)
अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडुन कोविड रुग्नांची उत्तम सोय व्हावी यासाठी यात्री मंडळाने निवासी जागा दिली. मात्र हि जागा मंडळाला परत देताना एक धार्मिक स्थळ म्हणुन पवित्रता इमारतीचे राखून रुग्णाची व्यवस्था करण्याऐवजी संताप उत्पन्न होईल असा प्रकार संबंधीत आपत्ती व्यवस्थापनाकडुन झाला.यामुळे वालचंदनगरचे स्वामी समर्थ मंडळाकडुन लवकरच सोलापुर जिल्हाचे पालकमंत्र्यांना व इंदापूर तहसिलदारांना निवेदन दिले जाणार आहे.
या संदर्भात लवकरच श्री स्वामी समर्थ अक्कलकोट प्रणित, वालचंदनगर येथील श्री स्वामी समर्थ मंडळाकडुन नुकतेच एक अॉनलाईन सभेचे अयोजन करणार आहे. या मध्ये अक्कलकोट येथील उद्भवलेल्या प्रश्नांसंदर्भात बोलताना वालचंदनगर श्री. स्वामी समर्थ सेवा मंडळाचे अध्यक्ष रमेश देशपांडे बोलताना म्हणाले कि ,श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले व न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले हे प्रशासनाला वेळोवेळी विविध माध्यमातून नेहमीच सहकार्य करीत असतात; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देखील कोवीड सेंटर हे यात्री निवास इमारतीत जागा दिली होती. मात्र याची पवित्रता राखून रुग्णाची व्यवस्था करण्याऐवजी दुरावस्था केल्याने तमाम स्वामीभक्तातून आपत्ती व्यवस्थानाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
अन्नछत्र मंडळ या धर्मादाय न्यासाच्या यात्री निवास ह्या निवासी इमारतीमध्ये एप्रिलपासून शासनाने कोवीड केअर सेंटर सुरु केले. या ठिकाणी गेली पाच महिने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना ठेवण्यात आले होते. यामुळे तेथील परिसर भयभीत झाला होता. सदरचे कोवीड सेंटर तातडीने अन्यत्र हलविण्यासाठी या न्यासाने वेळोवेळी विनंती अर्ज, निवेदन शासनास सादर केले. तसेच काही सामाजिक संस्था व राजकीय पक्षाने सुध्दा सदरची सेंटर हलविण्यासाठी पाठपुरावा केला. त्यावेळी शासनाने दुसरीकडे जागा बघून त्या ठिकाणी कोवीड सेंटरसाठी मंडळाकडून ५० बेडची मागणी केली. मंडळाने प्रशासनास तातडीने सदरचे बेड देवू केल्यानंतर दि.२४ऑगस्ट रोजी सेंटर हलविण्यात आले.
यात्री निवास ही इमारत रिकामी झाल्यानंतर स्वच्छता करुन प्रशासनाने न्यासाच्या ताब्यात द्यायला हवी होती, परंतु तसे न झाल्याने मंडळाने सफाई कामगार लावून संपूर्ण इमारतीची स्वच्छता करण्याचे काम हाती घेतले. गेल्या पाच महिन्यात या इमारतीचा वापर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णासाठी होत असल्याने इमारतीमध्ये प्रचंड घाणीचे साम्राज्य, अस्वच्छता होती. आपत्ती व्यवस्थापनाकडून इमारत वेळोवेळी स्वच्छ न केल्यामुळे प्रचंड दुर्गंधी पसरली होती. त्याचप्रमाणे या इमारतीमधून आठ पोते दारुच्या व बिअरच्या बाटल्या काढण्यात आल्या. तसेच पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांच्या खच, पडलेला होता. गुटखा व सिगारेटची पाकिटे, अस्ताव्यस्त पडलेला केरचा कचरा, भिंतीवर थुंकलेल्या पिचकार्या डस्टबीन व इमारतीच्या कोपर्यातून हाडे व सडलेले मांस आदी या सर्व गोष्टी चिड आणणारे आहेत. इमारतीच्या पावित्र्यास धक्का लागला आहे. सदर इमारत ही एक धार्मिक स्थळ असून या ठिकाणी नियमित हजारो स्वामी भक्तांच्या निवासासाठी वहिवाट असते. येथे येणारा स्वामीभक्त मोठ्या भक्तीभावाने येतो. सदरचे दृश्य पाहता स्वामीभक्तांच्या भावनाशी खेळण्यासारखे आहे. कोवीड सेंटर किंवा क्वारंटाईनसाठी इमारत घेते वेळेस या सर्व बाबींचा प्रशासनाने विचार करायला हवा होता. यात्री निवास इमारतीची कोवीड सेंटरमुळे वाट लागली आहे. यामुळे अक्कलकोट शहरवासिय आणि तमाम स्वामीभक्तांमधून संताप व्यक्त होत आहे.
पावित्र्य जपायला हवे होते :
कोरोना महामारीत आपत्ती व्यवस्थापन प्रमुखांनी प्रत्येक बाबतीत अलर्ट रहायला हवे होते. असे न केल्याने यात्री निवासाची दुरावस्था मोठ्या प्रमाणात झालेली आहे. न्यासाचे वेळोवेळी प्रशासनाला सहकार्य करुन त्यांच्याकडून इमारतीची देखभाल ही करणे गरजेचे होते. तसे न झाल्याने आजची स्थिती पाहता संतापजनक आहे.
श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ वालचंदनगर ,सचिव अमोल राजपूत,उपाध्यक्ष वैभव कदम, खजिनदार, निलेश चव्हाण, उमेश सगरे, अमरसिंह निंबाळकर, विजय कांबळे, सल्लागार राम कुंभार ,राजू भाटिया,
Like this:
Like Loading...
Related