फलटण प्रतिनिधी – शहरातील सर्व दुकानदार, फळे भाजी विक्रेते, तसेच शहरातील सर्व नागरिक यांना कळविणेत येते की, कोरोना रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने फलटण नगर परिषद क्षेत्रातील प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून शहरातील सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्ती, मास्क न वापरणाऱ्या व्यक्ती तसेच सोशल डिस्टंसिंग न पाळणाऱ्या व्यक्ती यांच्यावर दंडात्मक कारवाई करणे कामी फलटण नगरपालिकेने ४ पथकांची पथकांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे प्रसिद्धीपत्रक फलटण नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी काढले आहे.
पत्रकार पुढे प्रसाद काटकर म्हणतात की, फलटण शहरांमध्ये फिरताना मास्कचा वापर न करणाऱ्या व्यक्तींवर ५०० रुपये दंड सार्वजनिक अथवा खासगी जागेच्या ठिकाणी थुंकल्यास १००० रुपये दंड दुकानांमध्ये प्रत्येक ग्राहकांमध्ये किमान ६ फूट अंतर राहील याची खात्री करावी तसेच दुकानांमध्ये एकाच वेळी ५ पेक्षा जास्त व्यक्तींना घेण्यास मनाई आहे. सदर आदेशाचे उल्लंघन झाल्यास प्रथम उल्लंघन झाल्यास १००० रुपये दंड दुकानदाराने दुसऱ्यांदा उल्लंघन केल्यास दोन २००० रुपये दंड व तिसऱ्यांदा उल्लंघन झाल्यास दुकानाचा परवाना ३ दिवसासाठी निलंबित करून दुकान ३ दिवसासाठी बंद ठेवण्यात येणार असल्याचेही पत्रकात नमूद करण्यात आले असून सर्व दुकानदार फळे भाजी विक्रेते यांनी हॅण्ड ग्लोज, मास्क याचा वापर करावा तसेच सायंकाळी ५:०० वाजता आपले दुकान व हातगाडे बंद करावेत सायंकाळी ५:०० नंतर दुकान अथवा बाजारपेठ फळ विक्रेते (हात गाडे)
दिसुन आलेस आपणावर दंडामक्त कार्यवाही करुन हातगाड्या परवाना रद्द करणेत येईल याची नोंद घ्यावी तसेच होमक्वारंटाईन केलेल्या व्यक्तींनी कोणत्याही परिस्थितीत १४ दिवस पूर्ण झाल्याशिवाय शहरांमध्ये फिरू नये. फिरताना निदर्शनास आल्यास त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई केली जाईल. तसेच शहरातील कोणत्याही नागरिकांना सर्दी-खोकला-ताप असल्यास ताबडतोब नगर परिषदेच्या दवाखान्यात अथवा ग्रामीण रुग्णालयाशी संपर्क करावा कोणताही ताप अंगावरती काढू नये. असेही पत्रकात शेवटी काटकर यांनी नमूद केले आहे.