सातारा दि.2 (प्रतिनिधी) कोरोनाच्या औषाधाची मानवी चाचणी करण्याकरीता माझा देह घ्या,जावली तालुक्यांतील मेढा गावातील नागरीकाने सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना निवेदन द्वारे केली मागणी.
साईन बोर्ड पेंटर व्यवसाय करणार्या किसन पांडूरंग सांळूखे वय ५५ रा.आंबेडकरनगर मेढा ता.जावली जि.सातारा यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हंटलं आहे की, आज आपल्या भारत देशात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे.या कोरोनाने देशातील अनेक जण मृत्यूमूखी पडले आहेत,त्यांना माझी श्रध्दांजली व कोरोनामूक्त झालेल्यांना शूभेच्छा आहेत.
आज आपल्या देशातील बरेच शास्रज्ञ कोरोना वरील लस तयार करण्यासाठी जीवाची बाजी लावून अहोरात्र संशोधनासाठी मेहनत करीत आहेत. या माझ्या भारतीय शास्रज्ञांना यश यावे म्हणून त्या तयार होणार्या लसीची चाचणी माझ्या देहावर व्हावी ही माझी नम्र विनंती आहे.कारण मी वर्तमान पत्रामंध्ये नेहमी वाचतो की कोरोना लसीसाठी प्राण्यांवर चाचणी करण्यात येते तरी आपण साहेब शास्रज्ञांना माझी ही विनंती की समस्त भारतीय बंधू-भगिनांना वाचविण्यासाठी माझ्या देहावर चाचणी करण्यात यावी आणि माझे हे निवेदन व हा संदेश महाराष्ट्राचे मूख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्यापर्यंत पोहचवावी ही नम्र विनंती.
निवेदनात पूढे सांळूखे यांनी म्हंटलं आहे की मी गेली 55 वर्षे सूखी जीवन काढले आहे.मला कोणताही रोग अथवा व्याधी नाही,मी शारिरीक दृष्ट्या तंदूरूस्त आहे.मी कोणत्याही व्याधीने ग्रस्त नाही.तरी ही माझी विनंती त्वरीत राज्याच्या मूख्यमंत्र्यांना कळवण्यात यावी.
सबंधित निवेदन सांळूखे यांनी प्रत्यक्ष जिल्हाधिकारी कार्यालयात 29 जून रोजी देऊन तशी पोहच ही घेतली आहे.