सोमेश्वरनगर मध्ये पहिलाच कोरोना पॉझिटिव्ह..
बारामती -प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील मुरूम या गावातील एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याने सोमेश्वरनगर परिसरात खळबळ उडाली आहे.या व्यक्तीला अचानक त्रास होऊ लागल्याने तो स्वतः जाऊन दि २ रोजी पुणे येथे हॉस्पिटलमध्ये दाखल झाला होता.
सकाळी त्याची कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. गेल्या चार महिन्यापासून सोमेश्वरनगर पारिसरातील नागरिकांनी काळजी घेतल्यामुळे या भागात एकही कोरोना रुग्ण नव्हता,
सापडल्यामुळे कोरोना रुग्णा मुळे नागरिकांनी इथून पुढे काळजी घेण्याची गरज आहे.



























