——–: या परिसरात ओढे-नाले ताली ताल काटे गच्च भरून वाहू लागली तर, शेतामध्ये पिकवलेल्या पिकांचे पावसाने नुस्कान झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी करून पंचनामे करण्याचा आदेश राज्य सरकारने द्यावा:——–
निरा नरसिंहपुर दिनांक 2 प्रतिनिधी सौरभ सुतार–
निरा नरसिंहपुर परिसरात पहिल्याच पावसाने हजेरी लावल्यामुळे बळीराजा (शेतकऱ्याला) आनंद झाला. एकीकडे कोरोनाच्या संकटात बळीराजा अडकलेला असताना मेघ राजाला जाग येऊन विजांच्या कडकडात आवाजाने पावसाची जोरदार हजेरी लावली. शेतकऱ्याने पिकवलेल्या पिकांना चांगले उत्पन्न घेण्यासाठी वातावरण निर्मान झाले. शेतामधील केळी, ऊस, डाळिंब, कलिंगडे, खरबुज, कांदा, मका, कडवळ, बाजरी, व इतर पालेभाज्या या पिकांसाठी चांगले उत्कृष्ट वातावर निर्माण झाले तर नीरा नरसिंहपुर, टणु ,गिरवी, ओझरे ,पिंपरी बुद्रुक, गोंदी, गणेशवाडी, शिंदे वस्ती, चव्हाण वस्ती, सराटी, लींबूडी, लुमेवाडी, या सर्वच परिसरामध्ये पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकरी राजा आनंद व्यक्त करीत आहे. बळीराजाने पिकवलेल्या मालाला राज्य सरकारने हमी भाव व चांगली बाजारपेठ मिळवून द्यावी अशी मागणी या परिसरातील शेतकरी राजा करीत आहे.