महाराष्ट्र न्युज फलटण प्रतिनिधी गणेश पवार
सातारा सहाय्यक कामगार आयुक्त संजय शामराव महानवर रा धुमाळ निवासस्थान सत्वशील नगर संभाजी नगर सातारा मूळ गाव माढा जिल्हा सोलापूर यांना कामगार नोंदणी करण्याकरिता दोन लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले याविषयी सातारा पोलीस स्थानकातून मिळालेल्या माहिती नुसार , लाच प्रतिबंधक विभागाने सापळा रचून २ लाखाची लाच स्वीकारताना महानवर यांना दि ६ फेब्रुवारी रोजी रंगेहाथ पकडले. या प्रकरणातील तक्रारदार हे लेबर सप्लायर व अध्यक्ष असून कंपनीमध्ये लेबर पुरवण्याचे काम करतात कामगारांची नोंदणी करण्यासाठी त्यांना संजय महानवर यांनी अकरा लाख रुपये लाचेची मागणी केली होती प्रत्यक्ष आठ लाख रुपये घेण्यावर सहमती झाली होती या मधील दोन लाख रुपये लाच घेताना लाच प्रतिबंधक विभाग यांनी सापळा रचून रंगेहाथ पकडले या पथकामध्ये अविनाश जगताप, पोलीस निरीक्षक, पो. हवा. शिंदे, पो. ना. ताटे, खरात पो. कॉ. काटकर, भोसले ला. प्र. वि. सातारा. यांनी सहभाग घेतला होता.