महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी कळंब शहाजीराजे भोसले
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन , इंदापूर शाखेच्यावतीने
आपल्या विविध समस्या व मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्याचे माजी संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांना निवेदन देण्यात आले.
ग्रामसेवक युनियन पदाधिकारी यांनी प्रशासन सेवेत काम करीत असताना येत असलेल्या अडचणी, कोरोना पार्श्वभूमी व आपल्या विविध समस्या तसेच वरिष्ठांकडून अपेक्षित सहकार्य याविषयी हर्षवर्धन पाटील यांना निवासस्थानी त्यांची भेट घेऊन व संवाद साधुन त्यातून मार्ग काढण्याची विनंती केली.
यावेळी सकारात्मक मार्गाने समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे युनियनला हर्षवर्धन पाटील यांनी आश्वासन दिले.
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन इंदापूर शाखेचे अध्यक्ष अमोल मिसाळ, सचिव रविंद्र बनसोडे तसेच युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते.