महाराष्ट्र न्यूज मुळगाव प्रतिनिधी :
शाळा हे समाजाचं प्रतिबिंब असते .समाजाच्या विविध स्तरातुन विद्यार्थी ज्ञानार्जन करण्यासाठी ज्ञानमंदीरात येत असतात सर्वधर्मसमभाव,समानता व समानतेची शिकवणूक शाळांमधुनच होत असते .शाळा हे समाजाच मंदिर आहे.सुसंस्कारीत पिढी घडवण्याच कार्य गुरुजनांकडून होत असते.विद्यार्थ्यांमध्ये शाळेबद्दल सदैव कृतज्ञेची भावना असली पाहिजे .ज्ञानार्जनासाठी या व सेवेसाठी जा ही भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजली पाहिजे .समाजाच प्रतिबिंबच शाळा असते.शाळेच्या भौतिक विकासासाठी संस्थेबरोबरच समाजाने आपला सहभाग वाढवावा.शाळांच्या प्रगतीसाठी पुढील काळात शाळांनी लोकसहभाग वाढवावा असे प्रतिपादन बेलवडे खुर्दचे उपसरपंच रामचंद्र पवार यांनी केले .
शासनाच्या मार्गदर्शन सुचनेनुसार ९ वी ते १२वीचे वर्ग सुरू करण्यात आले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर न्यू इंग्लिश स्कूल बेलवडे खुर्द विद्यालयात विद्यार्थ्यांना मास्क वाटप प्रसंगी ते बोलत होते .यावेळी ग्रामविकास अधिकारी मधुकर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती .विद्यालयास आॕक्सिमिटर,सॕनिटायझर ,स्प्रे भेट देण्यात आले.सर्व विद्यार्थ्यांना मास्क मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले.[ग्रामविकास अधिकारी मधुकर पाटील यांनी विद्यार्थ्यांना योग प्रात्यक्षिके,प्राणायाम ,सूर्यनमस्कार इ.संबंधी सविस्तर मार्गदर्शन केले.
स्वागत प्रा .मुख्याध्यापक अनिल मोहिते यांनी केले.प्रास्तविक शंकर सुतार यांनी केले .आभार विठ्ठल डामसे यांनी मानले.