
राजवर्धन पाटील यांनी कडाळे कुटुंबास भेटून केले सात्वंन …
( महाराष्ट्र न्यूज कळंब प्रतिनिधी शहाजीराजे भोसले )
कळंब – भोरकरवाडी ( ता. इंदापूर ) येथे लहान भावाचा मृत्यू झालेला धक्का मोठ्या भावाला सहन न झाल्याने मोठ्या भावाचा ही मृत्यू झाला . या घटनेत यशराज नवनाथ कडाळे ( वय १५ ) व यशवंत नवनाथ कडाळे ( वय १३ ) या दोन सख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला . मृत्यूमुळे कळंब – भोरकरवाडी वर शोककळा पसरली .
नोकरी निमित्त वडील परदेशात असल्याने हे दोघे भाऊ आई समवेत कळंब-भोरकरवाडी येथे मामाच्या घरी संतोष धाईंजे याचेकडे रहात होते. राजवर्धन पाटील यांनी त्यांच्या घरी कडाळे व धाईंजे कुटुंबाची भेट घेऊन , धीर दिला व सात्वंन केले .यावेळी कळंब ग्रामपंचायतीचे सदस्य संजय व ग्रामस्थ उपस्थित होते.
वैद्यकीय सुत्रांनी यासंदर्भात दिलेल्या माहितीनुसार ह्रदयाच्या आजाराने मृत्यू झाला असण्याची शक्यता असल्याचे सांगितले. वालचंदनगर पोलीस ठाण्यात दोन्ही भावांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. या ह्रदय हेलावून टाकणारे घटनेमुळे कळंब-भोरकरवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मृत्यू पावलेले सख्ये भाऊ
मृत्यू पावलेले कुटुंबाचे सात्वंनासाठी कळंब-भोरकरवाडी येथील कडाळे व धाईंजे परिवारास राजवर्धन पाटील यांनी भेट दिली .























