शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : हिंदूहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिबीराचे आयोजन
पाचगणी : शिवसेना हिंदूहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना करहर विभाग आणि बालाजी ब्लड बँक सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरात १५१ रक्तदात्यांनी रक्तदान करून सहभाग नोंदविला.
करहर, ता. जावळी येथे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त करहर विभागातील शिवसैनिकांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराचे फित कापून उद्घाटन सातारा, सांगली संपर्क प्रमुख तथा शिवसेना उपनेते प्रा. नितीन बानगुडे- पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. प्रथमतः बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी जावळीचे माजी आमदार सदाभाऊ सपकाळ, सातारा जावळी संपर्क प्रमुख एकनाथ ओंबळे, जिल्हाप्रमुख संतोष मोहिते, वाहतूक सेना उपजिल्हाप्रमुख विक्रांत गावडे, तालुका प्रमुख विश्वनाथ धनावडे, उपतालुका प्रमुख ज्ञानेश्वर गोळे, शिवसेना म्हसवे गट समन्वयक संजय बेलोशे शिव सामर्थ्य सेना तालुका अध्यक्ष उमेश दुर्गावळे, उपाध्यक्ष रवी पार्टे ,युवा नेते नितीन गोळेव आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना शिवसेना उपनेते प्रा. बानगुडे -पाटील म्हणाले शिवसेनेच कार्य नेहमीचं समाजभिमुख राहिले असून येथे राजकारणापेक्षा समाजकार्याला प्रथम प्राधान्य दिले जाते. शिवसेना आणि रक्तदान शिबिर याचे अनोख नात असून मुंबई सारख्या शहरात शिवसेना शाखा नेहमीचं रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून रुग्णसेवेला अग्रक्रम देत आली आहे. आज बाळासाहेबांच्या ठाकरेंच्या जयंतीनिमित्त करहर विभागातील शिवसैनिकांनी रक्तदान शिबीर आयोजित करून शिवसेनाप्रमुखांचे विचार आचरणात आणले आहेत, असे गौरवउदगार काढले.
हे रक्तदान शिबिर करहर विभागातील शिवसैनकाच्या वतीने व बालाजी ब्लड बँक सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. यामध्ये १५१ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवित रक्तदान केले. या सर्व रक्तदात्यांना हेल्मेट आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
रक्तदान शिबिर यशस्वी करण्याकरिता संदीप (बापू) गोळे, प्रकाश गोळे, बाळू यादव विभाग प्रमुख गणेश गोळे, हनुमंत गोळे, नारायण पार्टे, आनंदराव पोफळे, सचिन पवार, तुळशीदास पार्टे, निलेश यादव, तसेच करहर पंचक्रोशीतील सर्व शाखपृमुख, उपशाखा प्रमुख तसेच आजी माजी सर्वच शिवसैनिकांनी शिबिर यशस्वी करण्याकरिता परिश्रम घेतले.
रक्तदात्यांना हेल्मेटचे वाटप
या शिबिराच्या निमित्तानेरक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना हेल्मेट देऊन आरोग्याच्या दृष्टीने करहर विभागतील सजी सैनिकांनी हेल्मेट किती महत्वाच असल्याचे पटवून दिले आहे.