महाराष्ट्र न्यूज कळंब-इंदापूर प्रतिनिधी शहाजीराजे भोसले
वालचंदनगर पोलीस ठाण्याकडून लाॅकडाऊनच्या कालावधीत गरजूंना मदत करून माणुसकीचे दर्शन घडविले आहे.
यावेळी मेन काॅलनीतील ६० कुटुंबाना सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या हस्ते किटचे वाटप करण्यात आले.सर्व सामान्यांना दिलासा देणारा उपक्रम राबवून पोलीस व जनता यांच्यामधील नाते जपले आहे.
यावेळी वालचंदनगर कंपनीचे सुरक्षा विभागाचे अधिकारी शैलेश फडतरे , वालचंदनगर ग्रामपंचायतीचे उपसरपंच हर्षवर्धन गायकवाड , वालचंदनगर राष्ट्रवादी पक्षाचे शहराध्यक्ष अमरसिंह निंबाळकर ,
विजय कांबळे , महेश सोलंकी व पोलीस अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते .