महाराष्ट्र न्यूज कळंब-इंदापूर प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले :
आज रेडणी गावठाण जिल्हा परिषदेच्या शाळेत इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी ऑनलाईन शिक्षण विषयी भेट देऊन ऑनलाईन शिक्षण बद्दल कौतुक केले व रेडणी शाळेचा उपक्रम एक पॅटर्न म्हणून इंदापूर तालुक्यात राबवला जाईल असे सांगितले .
या उपक्रमात लर्ण वर्क होम, गुगल मीट अपचा वापर , वर्गनिहाय ग्रुप , ऑनलाइन शिक्षणकरीता विद्यार्थी दत्तक योजना , व्हाट्सअॅप ग्रुपद्वारे विद्यार्थ्यांना दररोज मार्गदर्शन व अभ्यास सराव, तसेच दर रविवारी अभ्यासपूर्वक पाठ्यक्रम याचे नियोजन केले जाते .
यावेळी गटशिक्षणाधिकारी राजेंद्र बामणे , तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ.सुरेखा पोळ , शिक्षण विस्तार अधिकारी बोरकर
शालेय केंद्र प्रमुख सांगळे , प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता जाधव , सहशिक्षीका सुप्रिया आगवणे , धनाजी तरंगे व पालक वर्ग उपस्थित होता.