महाराष्ट्र न्यूज पाटण प्रतिनिधी :
पाटण तालुक्यात ‘बीएसएनएल’ सेवा पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे. या विस्कळलेल्या सेवेमुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मोबाईल रेंज आणि इंटरनेट सेवा विस्कळीत झाल्यामुळे पोस्ट ऑफिस, बँका तसेच आर्थिक संस्था यांचे व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आहेत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.
डोंगरदऱ्यांनी व्यापलेल्या आणि दुर्गम समजल्या जाणार्या पाटण तालुक्यातील कानाकोपर्यात नागरिकांच्या हातात मोबाईल पोहोचले आहेत. मात्र अनेक ठिकाणी ‘बीएसएनएल’ ची रेंज नसल्या कारणाने ग्राहकांकडून तक्रारी केल्या जात आहेत. यात पाटण, मल्हारपेठ ,नवारस्ता, कोयना विभागातील ‘बीएसएनएल’ सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे त्यावर अवलंबून असलेले सर्व व्यवहार खंडित झाले आहेत. काही दिवसांपासून ही सेवा ठप्प असून देखील या विस्कळीत कारभाराकडे संबंधित अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. शेतकरी, विद्यार्थी, शासकीय कार्यालयांमधील, संस्थांमधील कर्मचारी पुरते वैतागले आहेत इंटरनेट बंद झाल्याने पोस्ट ऑफिस बँका संस्था यामधील व्यवहार बंद आहेत. त्यामुळे नागरिकांची कोणतीच कामे होत नाहीत. त्यांची गैरसोय होत आहे.त्या संदर्भात बीएसएनएल’च्या कार्यालयात अथवा वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता उर्मट व उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत.
‘बीएसएनएल’च्या या विस्कळीत कारभारामुळे नाइलाजास्तव ग्राहक इतर टेलिकॉम कंपनीकडे वळत आहेत. ‘बीएसएनएल’ चे ग्राहक कंपनीच्या विस्कळीत कारभारावर पुरते वैतागले आहेत. मोबाईल व इंटरनेट ची सेवा पुरविण्याकडे वरिष्ठांनी गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे.