संस्थेचे संस्थापक रामभाऊ लेंभे यांची माहिती
संस्थेचे सभासद, खातेदार, ठेवीदार, कर्जदार,ग्राहक व हितचिंतक यांना दिपावलीच्या शुभेच्छा व्यक्त करून संस्थापक रामभाऊ लेंभे म्हणाले, कोरोना महामारीत छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्थेचे संचालक,व्यवस्थापनाचे मार्गदर्शनाखाली सेवकांनी कोरोनायोध्दा बनून जेष्ठ नागरिकांना व मागेल त्याला घरपोच सेवा दिल्याने ग्राहकांचा संस्थेवरील विश्वास वाढून संस्थेच्या सर्वच बाबतीत वाढ झाली आहे.३० सप्टेंबरअखेर संस्थेचे भागभांडवल २४ कोटी ८२ लाख,कर्जवाटप ३६० कोटी ३३ लाख,स्वनिधी ५० कोटी ५ लाख,खेळते भांडवल ५५६ कोटी ३० लाख,गुंतवणूक १३७ कोटी, संमिश्र व्यवसाय ८४२ कोटी ५९ लाख,सभासद संख्या ५८६६१ अशी आर्थिक सुस्थिती असून सर्व शाखांमधून ग्राहकांना मोबाईल बँकींग सुविधा,सभासद व कर्जदार यांचा मोफत अपघाती विमा उतरून त्यांचे कुटुंबीयांची काळजी घेणारी छत्रपती संभाजी महाराज पतसंस्था महाराष्ट्रातील एकमेव पतसंस्था आहे.सुरक्षित गुंतवणूक व सुलभ कर्जवाटप यासाठी प्रसिद्ध असलेल्या या संस्थेत १०० कोटींचा सोनेतारण कर्ज व्यवहार, एकूण कर्जापैकी ९५ टक्के तारणी कर्ज वाटप असे सुरक्षित येणे कर्ज असून पतसंस्थेचे फक्त नाव मात्र कारभार सक्षम बँकेसारखाच असणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्थेने आधुनिक तंत्रज्ञानाचा स्विकार करून सीबीएस प्रणाली राबवून ग्राहकहित जोपासले आहे. त्यामुळे संस्थेच्या सर्व शाखांमधून आरटीजीएस, एनईएफटी, आयएमपीएस, युपीआयची सुविधा उपलब्ध केल्याने खातेदारास त्वरित पैशाची इतर खात्यात किंवा इतर बँकेत देवाणघेवाण करणे सोईचे झाले आहे. व्यवहाराचे त्वरित मेसेज खातेदाराचे मोबाईलवर येतात.
मोबाईल बँकींगसाठी संस्थेने अँप विकसित केले असून ग्राहकांना आपल्या अँन्डाँईड मोबाईलद्वारे घरबसल्या केव्हाही कोणतीही बीले भरणे व फंड ट्रान्सफर करणे सोईचे झाले आहे. संस्थेच्या अनेक शाखांचे कारभार स्वमालकीचे इमारतीतून सुरू असून पिंपोडे बुद्रुक येथे संस्थेची स्वमालकीची सुसज्ज तिमजली इमारत, स्थापनेपासून बिनविरोध संचालक मंडळ निवडीची ऐतिहासिक परंपरा, व्हिडीओ काँन्फरन्स सिस्टीम, सेवकांसाठी बायोमेट्रिक प्रणाली, लाँकर सुविधा, संस्थेची स्वतंत्र वेबसाईट, संस्थेचे मुखपत्र छत्रपती ग्रुप न्यूज मासिक, पाच मिनिटांत सोनेतारण कर्ज, अडचणीतील १३ पतसंस्थांचे विलिणीकरण करून ठेवीदारांना दिलासा, स्टँन्डर्ड सीडी रेशो,५८ वर्षे पूर्ण अशा जेष्ठ नागरिकांना अर्धा टक्के जादा व्याजदर, विनम्र व तत्पर सेवा, प्रशिक्षित सेवकवर्ग आदी वैशिष्ट्यांनी संस्था परिपूर्ण आहे, असेही संस्थापक लेंभे यांनी सांगितले.