महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी वाई : दि.१ सप्टेंबर रोजी दिशा अकॅडमी वाई व कोमल न्यू लाइफ फॉउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने कै.कोमल पवार-गोडसे यांच्या प्रथम स्मूर्तीदिना प्रसंगी अवयवदान सर्वश्रेष्ठ दान या विषयावर मार्गदर्शन व कोमल पवार-गोडसे स्मूर्ती पुरस्कार प्रदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कोमल पवार-गोडसे या भारतातील हृदय-फ़ुपुस प्रत्यारोपण शत्रक्रिया यशस्वी पने पार पडलेल्या पहिल्या रुग्ण होत्या. शस्त्रक्रियेतुन ठीक झाल्यानंतर २०१७ मध्ये त्यांनी कोमल न्यू लाइफ फॉउंडेशन ची स्थापना केली व त्या माध्यमातू अवयव दान चळवळ कार्य सुरु केले. पण दि.१ सप्टेंबर २०२० रोजी त्यांचे निधन झाले. फाऊंडेशन तर्फे त्यांच्या स्मूर्तीप्रीत्यर्थ त्यांच्या नावे या चळवळीत मोलाचे कार्य करणाऱ्या व्यक्तींसाठी पुरस्कार देण्याचे सुरु करण्यात आले आहे. पुरस्काराचे हे प्रथम वर्ष असून सुनील देशपांडे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सुनील देशपांडे हे अवयव दानाच्या चळवळीत मागील कित्येक वर्ष काम करत असून त्यांनी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांची पायी यात्रा करुण सर्व लोकांमध्ये अवयव दानाचे महत्व पटवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यांनी लिहलेली अवयव दानाची शपथ ही महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त झाली असून तीच शपथ आज सर्वांना कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्यात आली.
प्रा.अनुपम गांधी यानी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. प्रा.डॉ.नितिन कदम यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले आणि कार्यक्रम आयोजनाचे महत्व यावर विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. तसेच कै.कोमल पवार गोडसे यांचा जीवन प्रवासावर प्रकाश टाकला. नगरध्यक्ष अनिल सावंत यांनी अवयव दानाच महत्व व तरुण पीडिचा सहभाग यावर मोलाचे मार्गदर्शन केले.
सत्कारमुर्ती मा. सुनील देशपांडे यांनी अवयवदानाचा इतिहास व पार्श्वभूमीवर विद्यार्थ्याना संबोधित केले.तसेच देशाच्या प्रगतिमधे अवयवदानाच महत्व, त्यातील तरुनाचा सहभाग व विविध संधर्बाच्या मदतीने दान व परोपकाराचे महत्व विद्यार्थ्याना पटवून दिले. यामध्ये शरीरा मधील विविध अवयवाचे दान तसेच नेत्रदान, देहदान यासाठी सर्वाना प्रेरित केले.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्वाना अवयव दानाची शपथ देण्यात आली.
या कार्यक्रमाला सत्कारमूर्ती सुनील देशपांडे, डॉ.शरद अभ्यंकर, अनिल सावंत नगराध्यक्ष वाई, कोमल न्यू लाइफ फॉउंडेशन अध्यक्ष धीरज गोडसे, रोटरी क्लब वाई अध्यक्ष दिपक बागडे, दिशा अकॅडमी संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.नितिन कदम हे उपस्थित होते. प्रा.डॉ. नितिन कदम यांनी सर्वांचे आभार प्रदर्शन केले व कार्यक्रमाची सांगता केली.






















