महाराष्ट्र न्यूज कळंब-इंदापूर प्रतिनिधी शहाजीराजे भोसले
इंदापूरमध्ये राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज अनोख्या पद्धतीने जनजागृती केली . इंगोले मैदानात भरलेल्या भाजी मंडईमध्ये जावून त्यांनी विक्रेते व ग्राहकांना सुरक्षितता बाळगणेचे आवाहन केले .
त्याठिकाणी स्वतः प्रत्येक विक्रेत्याकडे जावून कोरोना बद्दल मार्गदर्शन केले . ग्राहकांनी भाजी घेताना व पैसे देताना तसेच विक्रेते यांनीही भाजी देताना व पैसे घेताना सॅनिटायझरचा वापर करावा , गर्दी टाळावी व सुरक्षित अंतर ठेवावे , अशी सुचना केली.
इंदापूर तालुक्यात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढला आहे , या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात असतानाच राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी रस्त्यावर उतरून जनजागृती करत नागरिकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने काळजी घेण्याचे आवाहन केले .




















