महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :
बारामती शहरात मागील काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हा वाढता प्रादुर्भाव कमी करण्याच्या दृष्टीने बारामतीत पुन्हा एकदा प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी दि. 7 ते दि.२१ सप्टेंबर पर्यंत जनता कर्फ्यू घोषित करण्यात आला आहे.
कोरोना मुक्त बारामतीत पुन्हा कोरोनाने रौद्र रूप धारण केल्याने नागरिकांंसह प्रशासनाची चिंता वाढली आहे. बारामतीत मागील तीन दिवसात तीनशेहून अधिक कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेले आहेत. गेल्या पाच महिन्यांतील हा उच्चांक आहे. यामुळे प्रशासनावर मोठा ताण आला आहे.अजूनही बारामतीत शिथिलता ठेवल्यास कोरोनाचा आणखी मोठ्या प्रमाणावर उद्रेक होण्याचा संभव आहे .त्यामुळे वेळ न दवडता बारामतीतील कोरोनाचे वाढते प्रस्थ रोखण्याच्या दृष्टीने नाईलाजास्तव प्रशासनाला पुन्हा एकदा बारामतीत लॉकडाऊन चा निर्णय घेतला असून जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पुढील चौदा दिवसांसाठी बारामती प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले आहे. लॉकडाऊनच्या या दुसऱ्या टप्प्यात बारामती तालुक्याच्या सर्व सीमा बंद राहणार आहेत.
हा चौदा दिवसांचा कंटेनमेंट झोन असून या कालावधीत सर्व प्रकारचे व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे नागरिकांनी त्यांना आवश्यक असणाऱ्या वस्तू व साधनांचा आत्ताच साठा करून घ्यावा. व प्रशासनास सहकार्य करावे असे आव्हान प्रशासनाकडून करण्यात आले आहे.