️नवी दिल्ली : कोरोनाच्या संकटकाळात नीट (NEET) आणि जेईई (JEE 2020) परीक्षा घेण्यावरुन काँग्रेस कडून जोरदार विरोध सुरु आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी नीट- जेईई परीक्षांचे आयोजन गरजेचे असल्याचे म्हटले आहे. त्यांनी चीन आणि जर्मनीचे उदाहरण देत स्पष्ट केले आहे की जर परीक्षा घेण्यास आणखी उशीर झाल्यास यंदाच्या शैक्षणिक वर्षात बदल होईल आणि असे झाल्यास ते योग्य ठरणार नाही. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी नीट आणि जेईई परीक्षांबाबत आपली भूमिका मांडली आहे.
शिक्षणमंत्री निशंक यांनी चीनमध्ये होणाऱ्या नॅशनल कॉलेज प्रवेश परीक्षा Gaokao Exam आणि जर्मनीत उच्च शिक्षणासाठी होणाऱ्या Abitur या प्रवेश परीक्षेचा हवाला दिला आहे. या दोन्ही देशांत कोरोना संकटात देखील प्रवेश परीक्षा घेण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.देश सध्या कोरोना महामारीच्या संकटाला तोंड देत आहे. मात्र, शैक्षणिक वर्ष आणि विद्यार्थ्यांचे करिअर यामुळे खराब केले जाऊ शकत नाही. यावरुन राजकीय पक्षांनी विनाकारण विरोध आणि राजकरण करु नये, असेही निशंक यांनी म्हटले आहे.
अभि
दरम्यान, एनटीएने बुधवारी नीट परिक्षेसाठी ॲडमिट कार्ड जारी केले. काल रात्री ८ वाजेपर्यंत सुमारे १५.३ लाख ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यात आले आहेत. यातील ७.९ लाख कार्ड नीर परीक्षेसाठी आहेत. तर ९.५ लाख विद्यार्थी जेईई परीक्षेत देणार आहेत. तर सुमारे १५ लाख विद्यार्थी नीट परीक्षा देणार आहेत.