फलटण : फलटण शहरांमधून सातारकराचे जाणारा बानगंगा नदी वरील रस्ता वाहतुकीसाठी आज जाऊन भारतीय जनता पार्टी च्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चाचे उपाध्यक्ष अनुप शहा यांच्या नेतृत्वाखाली वाहतुकीसाठी खुला केला. सदरचा रस्ता सुमारे पंधरा दिवस बंद असल्याने शाळेत जाणारी विद्यार्थी महिला वयोवृद्ध यांना मनस्ताप सहन करावा लागत होता .
याबाबत नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या होत्या याबाबत आज शहा यांनी पुढाकार घेऊन भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सदर चा रस्ता वाहतुकीसाठी खुला केल्याने नागरिकांच्या अडचणी दूर होणार आहेत. यावेळी फलटण शहर भाजपचे उपाध्यक्ष निलेश चिंचकर, सरचिटणीस ज्योतीराम घनवट, फलटण शहर किसान मोर्चा अध्यक्ष नितीन वाघ ,सरचिटणीस अक्षय पंडित ,स्थानिक रहिवासी गणेश शिंदे ,सुरज राऊत ,मुन्ना शेख, संदीप हिरणवाळे, दिगंबर लाळगे , ननावरे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.