दहिवडी :राणंद ता.माण येथील प्रतिक महेश शिंदे यांची काल सातारा जिल्हा फार्मसी कृती समितीच्या सोशल मिडिया अध्यक्षपदी निवड झाली व खटाव सोशल मीडिया मयुर माने,फलटण सोशल मीडिया पदी अजिंक्य घाडगे व अक्षय कापुरकर कराड सोशल मीडिया याची निवड करण्यात आली आहे. समितीचे कार्य महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी यशस्वी प्रयत्न कराल अशी ग्वाही दिली आहे. ही निवड प्रक्रिया ऑनलाईन मीटिंगद्वारे अध्यक्ष मा.आकाश हिवराळे,पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, सौरभ भोईटे,परिमल ठाकरे सो.मि.पश्चिम महाराष्ट्र व सातारा जिल्हाध्यक्ष प्रथमेश कावडे व चैतन्य गबंरे कार्याध्यक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने बिनविरोध पार पाडली.
प्रतिक शिंदे यांचे सर्व पदाधिकारी,मित्रपरिवार व कुटुंबाकडून अभिनंदन होत आहे.