महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी/बारामती : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जळोची (विस्तारीत कक्ष) शाखेचा उद्घाटन समारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते रविवारी दिनांक ३१ रोजी सकाळी ७.३० वाजता पार पडला. यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यादरम्यान या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बाळासाहेब पाटील तावरे, चेअरमन दि माळेगाव सहकारी साखर कारखाना लिमिटेड माळेगाव बुद्रुक, पुरुषोत्तम जगताप चेअरमन श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना लिमिटेड सोमेश्वरनगर, व प्रशांत काटे चेअरमन श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना लिमिटेड भवानीनगर, प्रमोद काकडे सभापती (बांधकाम) जिल्हा परिषद पुणे, संभाजी होळकर अध्यक्ष बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस, पौर्णिमा तावरे नगराध्यक्ष बारामती नगर परिषद बारामती, नीता बारवकर सभापती पंचायत समिती बारामती, किरण गुजर ज्येष्ठ नगरसेवक बारामती नगर परिषद बारामती, सचिन सातव नगरसेवक बारामती नगरपरिषद, संदीप जगताप चेअरमन बारामती तालुका दुध संघ, श्रीकांत सिकजी चेअरमन बारामती सहकारी बँक बारामती, शिवाजीराव टेंगले, चेअरमन बारामती तालुका खरेदी विक्री संघ, अनिल खलाटे चेअरमन बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती बारामती, त्याचप्रमाणे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित पुणे चे प्रतापसिंह चव्हाण मुख्य कार्यकारी अधिकारी, मदन राव देवकाते संचालक पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक, अर्चना घारे उपाध्यक्ष पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक व सर्व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत जळोची शाखा (विस्तारीत कक्ष) उद्घाटन समारंभ पार पडला.