महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :लोणंद
परमश्रेष्ठ अल्लाह/परमेश्वर आपल्याला प्रिय असणार्या गोष्टी प्रसंगी हिरावून आपली परीक्षा घेत असतो. जो या कसोटीत पूर्णपणे उतरतो तोच खरा बंदा /भक्त म्हणून परमेश्वराच्या प्रेमास पात्र होतो. परमश्रेष्ठ अल्लाहच्या /परमेश्वराच्या भक्तीमार्गात केल्या गेलेल्या अस्सीम त्यागाचे ‘ईद-उल्-जुहा’ हे प्रतीक आहे आणि बकरी ईद यालाच ‘ईद-उल्-जुहा’ म्हटले जाते. अल्लाहसाठी /परमेश्वरासाठी आपल्या प्रिय गोष्टीचे बलिदान ‘कुरबानी’ महत्त्वाचे व प्रिय आहे.

कोविड-१९ मुळे उद्धवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीत आपल्या सभोवतालची परिस्थिती गंभीर झाली आहे, कोरोना बाधित रुग्णाच्या संख्येत रोज वाढ होत आहे, या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी शासन स्तरावर अनेक यंत्रणा अहोरात्र झटत आहेत, शासन स्तरावरून राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी घातली आहे. त्यास अनुसरुन बकरी ईदची नमाज मस्जिद अथवा ईदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता समाज बांधवांनी आप आपल्या घरीच अदा करावी असे आवाहन केले जात आहे हे आवाहन आपणा सर्वांच्या हितासाठी असुन या आवाहनाला प्रतिसाद देऊन सर्व समाज बांधवांना विनंती आहे कि बकरी ईदची नमाज मस्जिद अथवा ईदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता पवित्र रमजा़न ईद जशा पद्धतीने साजरी केली तशाच पद्धतीने आप आपल्या घरीच अदा करावी व या कोरोना व्हायरस संकटातून संपूर्ण जगातील नागरिकांचे रक्षण करावे अशी परमश्रेष्ठ अल्लाह कडे दुआं करावी.
कुर्बानी करताना तसेच हिस्सा वाटप करताना कृपया गर्दी होणार नाही याची काळजी व खबरदारी घ्यावी व महत्त्वपूर्ण बाब म्हणजे शहर /गावांत जिथे कंटेन्टमेंट झोन आहेत तेथे शासकीय निर्बंधानुसार सुचनांचे पालन करत सर्व कार्य शासकीय नियमांना बाधा न पोहोचता सुरक्षितता बाळगत केले जावे, जेवणावळींना फाटा देत ईद आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थित साजरी करावी तसेच आपल्या हातून गैरकृत्य होणार नाही व समाजास गालबोट लागले जाईल असे वर्तन होणार नाही याची काळजी व खबरदारी घ्यावी.
शासन स्तरावरून जनहितासाठी विविध मार्गदर्शन सुचना येतील अशा अजुन काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करण्यात येऊन शासनास सहकार्य करावे असे विनंती आवाहन साथ प्रतिष्ठाण चे अध्यक्ष कय्युम मुल्ला यांनी समाज बांधवांना करत ‘ईद-उल्-जुहा’ म्हणजेच बकरी ईद च्या शुभेच्छा दिल्या आहेत.






















