जिल्हापरिषदेच्या मैदानावर सायं. 5.00 वाजता शानदार उद्घाटन माजी मंत्री तथा भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे-पालवे यांच्या हस्ते उद्घाटन
सातारकरांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे नक्षत्रच्या अध्यक्षा श्रीमंत छत्रपती सौ. दमयंतीराजे भोसले यांचे आवाहन
सातारा : सातारकर ज्या महोत्सवाची उत्स्फूर्ततेने वाट पहात असतात, त्या नक्षत्र महोत्सव-2024 चे आयोजन दिनांक 26 जानेवारी 24 ते 30 जानेवारी 2024 अखेर जिल्हापरिषदेच्या विस्तिर्ण मैदानावर करण्यात आले आहे. या महोत्सवाचा उद्घाटन समारंभ भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव आणि राज्याच्या माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या शुभहस्ते 26 जानेवारी 24 रोजी सायंकाळी 5.00 वाजता होणार आहे. आपल्या विशेष कार्यशैलीमुळे लोकप्रिय असणारे आदरणीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार असून, या सातारकरांच्या महोत्सवास बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन नक्षत्र संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा श्रीमंत छत्रपती सौ. दमयंतीराजे ओसले आणि उपाध्यक्षा सौ. स्मिता घोडके यांनी केले आहे.या कार्यक्रमास उद्घाटक म्हणून ज्यावेळी पंकजाताई मुंडे यांना आम्ही नक्षत्रच्या वतीने विनंती केली त्यावेळी त्यांनी आपला नाशिक दौरा नियोजित असला तरी मी वेळात वेळ काढून राजधानी सातारा येथे 5.00 वाजता उपस्थित राहीन अश्या शब्दात लगेचच मान्यता दिली आणि त्यानुसार पंकजाताई मुंडे यांनी त्यांच्या व्यस्त कार्यक्रमात काही अंशी बदल करुन, विशेष हेलिकॉप्टरव्दारे राजधानी सातारा येथे येण्याचे नियोजन केले आहे.
श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि आमच्या कुटुंबाचे ऋणानुबंध फार वेगळे आहेत. स्व.गोपीनाथ मुंडेसाहेबांचे दुर्दैवी दुखःद निधन झाले त्यावेळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे सख्या भावाप्रमाणे पहाडासारखे आम्हा भगिनींच्या पाठीशी उभे राहीले होते हे आम्ही कधीच विसरु शकत नाही अश्या भावना देखिल त्यांनी दूरध्वनीवरुन व्यक्त केल्या होता. सातारकरांच्या भेटीस नक्षत्रच्या माध्यमातुन संधी मिळत आहे ती दवडणे शक्य नाही असे देखिल त्यांनी आवर्जुन सांगीतल्याचे नक्षत्रच्या उपाध्यक्षा सौ. स्मिता घोडके यांनी नमुद केले आहे.
या पार्श्वभुमीवर पंकजाताई मुंडे यांचे स्वागतासाठी आणि उद्घाटन कार्यक्रमास सातारकरांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आहे असेही नक्षत्रच्या वतीने करण्यात आले आहे.