रेल्वे प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यांने पार्ले रेल्वे गेटवरील आंदोलन तात्पुरते स्थगित.
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी :
कोपर्डे हवेली : पार्ले ता कराड च्या हद्दीतील रेल्वे गेट क्रमांक एल सी ९८ या ठिकाणी भुयारी मार्गाचे काम सुरू आहे. सदर पुलामध्ये पाणी साचत आहे त्यासंदर्भात कायमस्वरूपी उपाययोजना करावी अन्यथा रेल रोको आंदोलन करण्यात येईल असा ईशारा लेखी निवेदनाद्वारे रेल्वे पोलीस स्टेशन यांना काही दिवसांपूर्वी रयत क्रांती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सचिन नलवडे यांनी दिला होता.त्या अनुशंगाने रेल्वे प्रशासनाने दखल न घेतल्याने बुधवारी सकाळी पार्ले, वडोली निळेश्वर ,कोपर्डे हवेली, येथील शेतकरी ग्रामस्थ यांनी आंदोलन करण्यास सुरुवात केली असता रेल्वेचे सातारा कार्यालयचे उप अभियंता कुमार सक्सेना यांनी आंदोलन स्थळी आले त्यांनी कार्यकर्त्यांचे म्हणने ऐकून त्यांच्या अडचणी प्रामुख्याने लक्षात घेऊन १० एप्रिल ते ३१ मे पर्यंत काम पुर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले।
लेखी आश्वासन दिल्याने सर्वांशी चर्च्या करुण आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले। रेल्वे पुलात साठलेले पाणी काढून देण्याचे काम पहिल्यांदा करावे व तदनंतरच रसत्याचे कांक्रीटीकरण करावे अन्यथा पुन्हा आम्ही तीव्र आंदोलन करु असा ईशारा सचिन नलवड़े यांनी दिला। यावेळी अनुचित प्रकार घडु नये म्हणून रेल्वे पोलीस, तालुका पोलीस मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सचिन नलवडे,काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अविनाश नलवडे,कोयना दूध संघाचे संचालक सुदाम चव्हाण,सरपंच आश्विनी मदने, माजी सरपंच बाळासाहेब नलवडे, सामाजिक कार्यकर्ते मोहनराव चव्हाण,वडोलीचे निळेश्वरचे सोमनाथ पवार,माजी उपसरपंच दयानंद पवार,अमित पवार,सुनिल पवार, प्रदिप पवार, माजी स्वातंत्र्य सैनिक शंकरराव पवार,यांच्यासह पार्ले, वडोली निलेश्वर, कोपर्डे हवेली येथील ग्रामस्थ शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रेल्वेच्या भुयारी मार्गातील साचुन रहाणारे पाणी पुर्णपणे काढून देऊनच काम सुरू करावे. शेतकऱ्यांना विद्यार्थ्यांना ये जा करण्यासाठी तात्पुरते गेटची व्यवस्था करावी त्यामुळे तिन गावांचा दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. दिलेल्या लेखी आश्वासनाप्रमाणे काम पूर्ण करावे.अन्यथा पुन्हा रेल्वे विरोधात तीव्र आंदोलन करणार रयत क्रांती सघटना जिल्हा अध्यक्ष सचिन नलवडे. रेल्वे प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यांने आंदोलन स्थगीत करण्यात आले यावेळी सचिन नलवडे, अविनाश नलवडे,सुदाम चव्हाण,दयानंद पवार,अमित पवार आदिंसह शेतकरी उपस्थित होते.