महाराष्ट्र न्यूज बारामती प्रतिनिधी / सुनिल निंबाळकर :
बारामती तालुक्यातील करंजे गाव ते निंबुत छपरी हा दोन कि.मीटर रस्त्याचे काम सुरू झाल्याने १००० एकर शेतकऱ्यांचा शेतीचा प्रश्न मिटणार आहे.तर हा रस्ता स्वखर्चानी व स्वतःच्या शेतातील गहू, मका,ऊस या उभ्या पिकातून देण्यास शेतकरी झाले तयार झाले आहेत. या कामाची पाहणी बारामतीचे तहसीलदार विजय पाटील यांनी याठिकाणी भेट देत पुढील काळात शेतकऱ्यांचे काही अडचणी असल्यास सोडवण्याचे आश्वासन दिले.
या कामा संदर्भात विशेष मार्गदर्शन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे बारामती तालुका अध्यक्ष संभाजी होळकर ,करंजे तलाठी आगम साहेब, तानाजी कोतवाल तसेच या रस्त्या लगत असणारे शेतकरी महेश शेंडकर, लहुजी होळकर,पांडुरंग हुंबरे, अतुल गायकवाड, भाऊसाहेब हुंबरे यांचे विशेष सहकार्य लाभले.






























