महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले (कळंब – इंदापूर)
मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या एस.एस.सी.परिक्षेचा कर्मयोगी शंकरराव पाटील माध्यमिक विद्यालय , कुरवली शाळेचा निकाल १०० % लागला असल्यामूळे उज्वल यशाची परंपरा कायम राहिल्याची माहिती प्राचार्य गणेश घोरपडे यांनी दिली .
या परिक्षेत एकुण ६८ विद्यार्थी बसले होते , त्यापैकी ३९ विद्यार्थी विशेष प्राविण्य गटात , २१ विद्यार्थी प्रथम श्रेणीत , ७ विद्यार्थी व्दितीय श्रेणीत तर १ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत . त्यामध्ये आलेले गुणानुक्रम : १.थोरात अनुजा बाळासाहेब ४८८/५०० – ९७.६०%
२.माने सृष्टी विलास ४७६/५०० – ९५.२०%
३.दिक्षीत ऋतुजा विनायक ४७४/५०० – ९४.८०%
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील , नीरा – भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील , उदयसिंह पाटील , सचिव किरण पाटील , पैलवान नितीन माने , प्राचार्य गणेश घोरपडे , सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले .






















