सातारा – कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीने वारंवार मागासवर्गीय कर्मच्याऱ्यांच्या सेवा विषयक अडी अडचणी बाबत शासन स्तरावर निवेदन देत असते . यामध्ये खुल्या प्रवर्गातुन पदोन्नतीस विरोध केलेला असुन सदरची प्रक्रिया सध्या स्थगित आहे . तसेच वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेले कर्मचारी , बेकायदेशीर प्रतिनियुक्ता , निलंबन , चौकश्या याबाबत वारंवार संघटनेच्या माध्यमातून आवाज उठवीत असल्या कारणाने तसेच २६ जानेवारी २०२३ रोजी बेकायदेशीर प्रतिनियुक्ती बाबत आत्मदहन आंदोलनाची नोटीस प्रशासनास दिली हा राग मनात धरून जि प मधील काही बडे अधिकारी व जिल्हा अधिकारी यांनी संगनमताने कुटील कट कारस्थान करून संघटनेचा आवाज दाबण्यासाठी संघटनेच्या जिल्हाध्यक्षांचे बेकायदेशीर पणे वेतन रोखुन आर्थिक शोषण केलेले आहे तसेच खोटे रेकॉर्ड करून जिल्हाध्यक्षांची खोटी व बेकायदेशीर शिस्तभंग विषयक कारवाई लावलेली आहे . सदरचा प्रकार हा डिस्क्रीमीनेशन चा भाग आहे . व डिस्क्रीमीनेशन कायद्याने गुन्हा आहे . म्हणुन सदर बाबत पुरावा म्हणुन मला उचित त्या न्यायाधिकरणाकडे सदरचे फुटेज हवे आहेत .सदरचा कुटील डाव हा मा मुख्य कार्यकारी अधिकारी सातारा यांचे ‘ दालनात दि . २२ /१ / २३ ते २९ / १ / २३ या तारखेस झालेला असुन तसेच मा . उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( ग्रा प . ) यांचे दालनातील दि २३ / १ / २३ रोजीचे सी . सी . टिव्ही फुटेज पुरावा म्हणुन मला भविष्यात सादर करावे लागणार असल्याने , मी त्या बाबत माहीती अधिकारात दोन्ही केबीनचे फुटेज रितसर मागणी केलेले आहेत . मला अघाप सदरचे फुटेज अप्राप्त आहेत . सदरचा पुरावा आपण जाणी पुर्वक नष्ट कराल अशी व्यक्तीशः मला खात्री आहे म्हणुन सदरचा अर्ज मी पुन्हा आपणास पाठवीत आहे कृपया सदरचे फुटेज नष्ट न करता ते राखुन ठेवावेत . ही विनंती