श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान वाई तालुका यांच्या वतीने दिनांक ३ जून रोजी श्री तुळजाभवानी भंडारा (महाप्रसाद) साठे धर्मशाळा येथे आयोजित केला होता याप्रसंगी काशिनाथ शेलार मामा यांनी उपस्थितांना प्रतिष्ठानच्या विविध उपक्रमांची माहिती दिली व त्या दृष्टीने कसे नियोजन करता येईल यावर प्रबोधन केले श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान वाई तालुका अध्यक्ष किशोर (काका )भोसले आणि सुभेदार आप्पासाहेब मालुसरे यांनी उपस्थित नगरसेवक व मान्यवरांचे स्वागत केले तसेच धारकर्यांनी उत्तम रित्या कार्यक्रमाचे नियोजन केले होते या कार्यक्रम प्रसंगी साहित्य व आर्थिक योगदान देणाऱ्या दात्यांचे आभार प्रतिष्ठानच्या वतीने मांडण्यात आल्याचे धारकरी बापू भोसले यांनी सांगितले.