महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले कळंब – (इंदापूर)
लॉकडाऊनचा फटका बसलेल्या दुध उत्पादक शेतकरी यांची राज्य शासनाने कोणतीही दखल घेतलेली नाही , त्यामुळे शासनाने गायीच्या दुधास प्रती लिटर ३० रुपये दर द्यावा , यासह अन्य प्रमुख मागणीसाठी दुध उत्पादक शेतकरी यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गावोगावी भाजपच्या वतीने आंदोलन करण्याचे आवाहन भाजपचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले होते .
त्यानुसार शनिवार . दि . १ ऑगस्ट २०२० सकाळी ११ वाजता कळंबच्या एस. टी स्टँड चौकात इंदापूर तालुक्याचे माजी सभापती प्रदिप पाटील यांच्या नेतृत्वाखाली दुध दर वाढीविषयी आंदोलन करण्यात आले . या वेळी संकलीत केलेले दुध गोरगरिबांना मोफत वाटुन शासनाचा निषेध नोंदवला. यावेळी रणजित (काका) पाटील यांनी राज्याचे दुग्ध विकास राज्य मंत्री यांना दुध दराबद्दल काही माहिती नसल्याचे व दुध उत्पादक शेतकऱ्यांचे काही देणेघेणे व कळवळा नसलेचे सांगुन शासनाचा निषेध केला . यावेळी महादेव कुंभार , भाऊसाहेब अर्जुन , चंद्रकांत कांबळे , राम पालवे , वैभव मोहिते , राजेंद्र भालेराव , गोपीनाथ अर्जुन , बबन जाधव , धनंजय वरुडकर ,संतोष गोरे , शिवाजी कोळी , हरिदास मोरे, बब्रुवान सुतार , रोहित मोहिते , शंकर कंठीकर , सुभाष घोडके , सुरेश वनवे आदी दुध उत्पादक शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.