फलटण :
फलटण तालुक्यातील साखरवाडी व खामगाव ग्रामपंचायत च्या परिसरामध्ये नुकतेच पंचवीस वर्षे देशसेवा करून सध्या सेवानिवृत्त झालेले व देशसेवेचे महान कर्तव्य बजावून भारतीय सेना दलातुन सेवा निवृत्त झालेले साखरवाडी गावचे व खामगाव गावचे सुपुत्र. दीपक जनार्दन खलाटे BSF.व .अनिल विष्णू गायकवाड BSF त्यांचे साखरवाडी व खामगाव ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्यावतीने जंगी स्वागत करण्यात आले
सकाळपासूनच आनंदाच्या वातावरणात साखरवाडी तील पोलीस स्टेशन चौका पासून या मिरवणुकीची सुरुवात झाली यावेळी सेवानिवृत्त सैनिकांचा रक्षक ग्रुप व ग्रामस्थ यांनी योग्य नियोजन करून अनेक मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ व हार देऊन दोन्ही सेवानिवृत्त सैनिकांचा सत्कार केला गेला
वर्धमान कार्यालय मध्ये सत्कार समारंभाचा समारंभ समारोप करताना दोन्ही सेवानिवृत्त सैनिकांनी देशसेवा प्रमाणेच समाजसेवेचेही अशीच प्रामाणिकपणे सेवा करू अशी ग्वाही दिली
त्याच बरोबर दोन्ही सेवानिवृत्त सैनिकांचे कुटुंबीय तसेच पै-पाहुणे व साखरवाडी ग्रामपंचायत चे माजी सरपंच विक्रमसिंह भोसले, तसेच महानंदा दूध डेअरी चे उपाध्यक्ष डी के पवार, फलटण पंचायत समितीचे माजी सभापती शंकरराव माडकर, श्रीराम साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन नितिन भोसले, साखरवाडी चे उपसरपंच अक्षय रुपनवर, तसेच विशेषतः खामगाव ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक डी.डी निंबाळकर, सरपंच शकुंतला रावसो वैद्य, उपसरपंच हिरामन चाबुकस्वार व ग्रामपंचायत सदस्य किसन झेंडे, राहुल सोनटक्के, तसेच तसेच खामगाव चे माजी सरपंच माधुरी प्रदीप जाडकर ,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पक्ष फलटण तालुकाध्यक्ष दादा जाधव, व पत्रकार बांधव यांनी जल्लोषात स्वागत केले
