महाराष्ट्र न्युज सातारा :- राहुल ताटे पाटील
गाईच्या दुधाला सरसकट दहा रुपये लिटर अनुदान व दूध पावडरला प्रति किलो 50 रुपये अनुदानाच्या मागणी करता आज 1 ऑगस्ट 2020 रोजी भाजपा रयत क्रांती संघटना शिवसंग्राम रा स प रिपाई इत्यादी महायुतीच्या राज्यव्यापी दूध आंदोलन आज सातारा अजंठा चौक येथे सातारा जिल्हाध्यक्ष विक्रमजी पावस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्ष राजेंद्र इंगळे, व इतर तालुका पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन पार पडले
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या संकटांमध्ये दिवसेंदिवस भर पडत असताना बँकेकडून आकारला जाणारा कर्जपुरवठा नकली सोयाबीन बियाणे युरिया खताचा तुटवडा काळाबाजार कोकणातील शेतकऱ्यांचे वादळामुळे झालेले नुकसान अनेक ठिकाणी अतिवृष्टी आणि आजचे दुष्काळाची परिस्थिती या संकटामुळे दूध उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे या कोणाच्या काळात दुधाचा विक्रीमध्ये 30 टक्क्यांपर्यंत घट झाली शहरातील हॉटेल्स चहाची दुकाने बंद असल्याने दुधाची मागणी घटली आजच्या घडीला खाजगी संस्था व सहकारी दूध संस्था संघाकडून 15 ते 16 रुपये लिटर भावाने दूध खरेदी करण्याची घोषणा केली परंतु प्रत्यक्षात सात लाख लिटर दूध खरेदी केल्या जात आहेत मंत्र्यांचे लागेबांधे असलेल्या दूध संघाकडून शासन दूध विकत घेत आहे व अशा पद्धतीने शेतकरी व दूध उत्पादकांना शासनाने वाऱ्यावर सोडले आहे इत्यादी साठी भारतीय जनता पार्टी यांच्यावतीने राज्यव्यापी दूध एल्गार आंदोलनाचे आयोजन करण्यात आले.या वेळी विविध गावातून आलेले दूध उत्पादक शेतकरी ,विठ्ठलजी बलशेटवार शहर सरचिटणीस, हेमंत शिंदे तालुकाध्यक्ष भाजपा किसान मोर्चा, गणेश पालखे, सुनिल जाधव, तसेच पक्षाचे सर्व मान्यवर उपस्थित होते
यावेळी तालुकाध्यक्ष राजेंद्र इंगळे यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले की ,महाविकास आघाडीच्या कार्यपद्धतीवर निषेध नोंदवला आणि दुध, दुधाची भूकटी यासंदर्भात दराबद्दल सरकारने त्वरित दखल घ्यावी… आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली, भारतीय जनता पक्ष या गोरगरीब शेतकरी आणि दूध उत्पादक बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील अशी ग्वाही दिली ..






















