महाराष्ट्र न्यूजप्रतिनिधी : शहाजीराजे भोसले(कळंब – इंदापूर)
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील , भाजपचे नेते हर्षवर्धन पाटीलसाहेब व गणेशभाऊ भेगडे यांच्या आदेशानुसार इंदापूर तालुक्यामध्ये तावशी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आले .
यावेळी भाजपचे नेते तानाजीराव थोरात , लालासाहेब सपकळ , संग्रामसिंह निंबाळकर , रवींद्र यादव , संतोष चव्हाण व आदी दुध उत्पादक शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते , यांनी आघाडी सरकार चा जाहीर निषेध केला , दुधाला ३० रुपये हमीभाव मिळाला पाहिजे , त्यासाठी प्रति लिटर १० रुपये अनुदान मिळाले पाहिजे व दुध भुकटीला ५० रूपये अनुदान मिळाले पाहीजे , अशा मागण्या आघाडी सरकारकडे करण्यात आल्या आहेत






















