विधान परिषद सभापती, पालकमंत्री यांच्या उपस्थितीत आढावा
सातारा : अतिवृष्टी व पुरामुळे शेतींचे नुकसान झाले आहे या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरु झाले आहे, या पंचनाम्यातून एकही बाधित शेतकरी राहू नये , अशा सूचना विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केल्या. अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीबाबत सविस्तर आढावा आज विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी घेतला. यावेळी आमदार मकरंद पाटील, आमदार दिपक चव्हाण, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
शेती नुकसानीचे पंचमनामे करण्याचे काम सुरु आहे. या पंचनाम्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करुन तसा नुकसानीचा अहवाल शासनाकडे सादर करावा, अशा सूचना पालकमंत्री श्री. पाटील यांनी या बैठकीत केल्या.आपण येत्या आठवड्यात संपूर्ण आढावा घेणार असल्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी यावेळी सांगितले.