दिवसाढवळ्या पाच लाखांहून अधिक रक्कमेवर डल्ला
लोणंद : लोणंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चांदोबाचा लिंब ते पाडेगाव रोडवर असलेल्या मॅग्नेशिया या केमिकल कंपनीतील कामगारांचा पगार घेऊन चाललेल्या गाडीवर संध्याकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास फलटण-लोणंद रेल्वेमार्गावरील पुलावर गाडी थांबवून गाडीची काच फोडून पाच अज्ञात चोरट्यांनी पाच लाख नऊ हजार असलेली रोकड लंपास केली आहे. या घटनेचा लोणंद पोलीस कसून तपास करीत आहेत .