महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :फलटण
नीरा खोऱ्यातील चार धरणांमध्ये आजच्या तारखेला गतवर्षीच्या तुलनेने कमी पाणीसाठा असल्याने शेतकरी वर्ग धास्तावला आहे .नीरा उजवा कालवा फलटण विभाग यांनी नीरा प्रणालीतील सध्याच्या पाणीसाठ्याची माहिती जाहीर केली आहे.
त्यानुसार 3 ऑगस्ट 2020 रोजी भाटघर धरणात 9. 42 ,वीर धरणात 3.80, नीरा देवघर,2.99 ,गुंजवणी 1.97 ,एकूण 18.18 टीएमसी इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. गतवर्षी याचकाळात 44.45 टीएमसी इतका पाणीसाठा उपलब्ध होता.
टक्केवारीच्या भाषेत तो 92.79 टक्के इतका होता. सध्याची टक्केवारी ही.37.61 इतकी आहे. नीरा नदीत विसर्ग सोडण्यात आलेला नाही. चारही धरणातील मिळून उपयुक्त पाणीसाठा क्षमता 48.33 टीएमसी एवढी आहे . आजमितीला त्यापैकी केवळ 8.18 टीएमसी पाणी साठा उपलब्ध आहे.