महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले (कळंब – इंदापूर)
इंदापूर तालुक्यातील संशयित कोरोनाग्रस्तांच्या २५ नमुन्यापैकी २० जण निगेटिव्ह आले असून तालुक्यातील भिगवण व बाभुळगाव येथे ३ कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत .
काल कोरोनाग्रस्तांच्या संपर्कातील इतर नातेवाईकांचे नमुने तपासणी साठी घेण्यात आले होते . त्यामध्ये भिगवण येथे नव्याने २ कोरोनाग्रस्त आढळून आले असून बाभुळगाव येथे १ कोरोनाग्रस्त नवा रूग्ण आढळून आला आहे .दरम्यान निमगांव केतकी येथील कोरोनाग्रस्तांच्या संपर्कातील सर्व संशयितांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत .




















