महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी(खटाव) :संतोष सुतार
खटाव तालुक्यातील वडूज व परिसरातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यातील काही गंभीर रुग्णांना वेळेवर बेड मिळत नाहीत. याचा विचार करून वडूज येथील तज्ञ डॉक्टरांनी आपली सामाजिक बांधिलकी म्हणून ग्रामीण रुग्णालय वडूज येथे होणाऱ्या कोविड सेंटरला दहा आय सी यू बेड (गादी सह) प्रदान केले आहेत.
यामध्ये डॉ. बी जे काटकर, डॉ. सौ शुभांगी बी काटकर, डॉ. इनामदार, डॉ. व्ही पी देशमुख, डॉ. एस डी कुंभार, डॉ. सौ शिला एस कुंभार, डॉ. शशिकांत लंगडे, डॉ. अशोक तासगावकर, डॉ. विजय बर्गे, डॉ. धनंजय खाडे, डॉ. सोमनाथ काळे, डॉ. अकबर काझी, डॉ. संतोष देशमुख, डॉ. अभिजित जाधव, डॉ. महेश काटकर, डॉ. देवकर, डॉ. प्रवीण चव्हाण यांनी सहकार्य केले आहे.






















