महाराष्ट्र न्यूज लोणंद प्रतिनिधी : बिलकीस शेख
इनरव्हील क्लब लोणंद इनरव्हिल क्लब अंबरनाथ हिल्स व इनरव्हील क्लब ठाणा सिटी गार्डन यांच्या संयुक्त विद्यमाने होम आईसोलेट पेशंटसाठी ऑक्सिजन सर्कयूलेशन मशीन घेण्यात आले. लोणंद येथील जे covid- पॉझिटिव्ह पेशंट होम आईसोलेट आहेत व ज्यांना ऑक्सिजनची गरज आहे अशा पेशंटसाठी इनरव्हील क्लब लोणंद च्या वतीने ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर ची सोय केली आहे. जे पेशंट घरी आयसोलेशन केलेले आहेत व ज्यांना ऑक्सिजनची मात्रा कमी पडत असेल तर त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्याने या मशीनद्वारे घरीच ऑक्सिजन पुरवता येईल ही सुविधा इनर विल च्या माध्यमातून विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

लोणंद इनर व्हील क्लब च्या अध्यक्ष डॉक्टर स्वाती शहा यांनी या महामारी च्या काळात गरजूंना धान्य वाटप आशा सेविकांना छत्री वाटप रक्तदान शिबिर यासारखे अनेक स्तुत्य उपक्रम इनरव्हिल च्या माध्यमातून राबवले आहेत. इनरव्हील क्लबच्या सेक्रेटरी शिल्पा शहा, आय एस ओ शमा शहा, खजिनदार संगीता बुटियानी, यांचे या उपक्रमास विशेष प्रयत्न लाभले लोणंद नगरपंचायत चे नगराध्यक्ष सचिन शेळके पाटील यांच्या हस्ते या मशीनचे उद्घाटन करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवर इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर नितीन सावंत, लोणंद मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर मिलिंद काकडे, डॉक्टर किशोर बुटीयानी, डॉक्टर दानी, डॉक्टर अवधूत किकले , रोटरी क्लबचे विश्वनाथ शानबाग व मुस्तफा लोणंद वाला तसेच अरिस्टा केमिकल कंपनीचे एम डी सतीश जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती. इनरव्हील क्लबच्या सर्व मेंबर उपस्थित होत्या.






















