महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी (कळंब – इंदापूर) : शहाजीराजे भोसले
इंदापूर तालुक्यात कोरोनाने विळखा आवळल्याने दररोज रूग्ण संख्या वाढण्याबरोबरच मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. गावांगावात कुटुंबे कोरोना बाधित आढळून येत आहेत . कोरोनाचा समुह संसर्ग चालू झाला असल्याने , शुक्रवार, दि. ११ सप्टेंबर रात्री १२ वाजल्यापासून २० सप्टेंबर रात्री १२ वाजेपर्यंत इंदापूर तालुका व शहर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या व्यापारी, नागरिक व पदाधिकारी यांच्या समन्वय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
यामध्ये दूध विक्री सकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. इमर्जन्सी मेडिकल सेवा सुरु ठेवण्यात येणार आहेत .तसेच इंदापूर शहर हद्दीत सर्व रस्ते सील करून शहरात प्रवेश बंद केला जाणार आहे.
इंदापूर तालुक्यातील शहर व ग्रामीण भाग पूर्णपणे ७ दिवस कडक लाॅकडाऊन करण्यात येणार असल्याचे राज्यमंत्री भरणे यांनी सांगितले .
यावेळी उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे , तहशिलदार सोनाली मेटकरी , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर , इंदापूर शहराच्या नगराध्यक्ष अंकिता शहा , गटविकास अधिकारी विजयकुमार परिट , प्रभारी वैद्यकीय अधिकारी एकनाथ चंदनशिवे, पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर , इंदापूर तालुका शिवसेना अध्यक्ष नितीन शिंदे, व्यापारी , नागरिक व राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते .