महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले (कळंब – इंदापूर)
इंदापूर तालुक्यातील कळंब येथील रहिवासी अभिमान शिंदे व त्यांच्या कुटुंबियांची त्यांच्या ५७ चाळ येथील घरी जावून नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन हर्षवर्धन पाटील यांनी भेट घेऊन सात्वंन केले .
अभिमान शिंदे यांचा मुलगा कै.तानाजी अभिमान शिंदे पत्नी व दोन मुली व एक मुलगा यांच्या समवेत वाघोली ( पुणे ) येथे नोकरी निमित्त रहात होता. गुरुवार , दि.६ ऑगस्ट रोजी वाघोली येथील घरी आत्महत्या केली होती . या आकस्मिक दुःखत घटनेचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही . हि घटना कळालेनंतर युवा नेते राजवर्धन पाटील यांनी शिंदे कुटूंबाच्या कळंब येथील त्यांच्या घरी जावून कुटुंबियांना धीर देवून त्यांचे सांत्वन केले. यावेळी शिंदे कुटूंबांसमवेत डाॅ. किसन पवार , पोपट चव्हाण , दुर्योधन करे व ग्रामस्थ उपस्थित होते