महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :श्रीकृष्ण सातव(फलटण )
नीरा खोऱ्यातील चार धरणांमध्ये आजच्या तारखेला 29.82 टीएमसी (61.70%) इतका पाणीसाठा उपलब्ध आहे .नीरा उजवा कालवा फलटण विभाग यांनी नीरा प्रणालीतील सध्याच्या पाणीसाठ्याची माहिती दिली आहे.
गतवर्षी याच काळात हा पाणीसाठा 46 .82 टीएमसी (96.87%) इतका होता.. भाटघर , वीर ,निरादेवधर आणि गुंजवणी या धरणाच्या पाणी क्षेत्रात अनुक्रमे 436,,341, 931, 667 मिलिमीटर इतका पाऊस झालेला आहे. त्यामुळे धरणांच्या पाणी पातळीत एकूण 3.265 टीएमसी इतकी वाढ झालेली आहे. धरणातून नीरा नदी मधील विसर्ग शून्य आहे. भाटघर , वीर , नीरा देवधर ,गुंजवणी या चारही धरणातील आजमितीला उपलब्ध पाण्याची टक्केवारी अनुक्रमे 60.66, 74.88, 48.67, 56.53 इतकी आहे या चारही धरणातील उपयुक्त पाणीसाठा क्षमता 48.33 टी.एम.सी इतकी आहे.